माय मराठी › जीवनशैली, आरोग्य व शेती

आपत्कालीन मदत क्रमांक

११२, पोलीस, रुग्णवाहिका, महिला-बाल मदत, सायबर, रक्तपेढी — एका टॅपमध्ये कॉल

आपत्कालीन मदत क्रमांक — निवडक मजकूर

112 — एकच आणीबाणी क्रमांक (पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका)
कोणत्याही संकटात आधी हाच क्रमांक. मोबाईलवर सिम नसतानाही किंवा लॉक असतानाही कॉल लागू शकतो.
100 — पोलीस नियंत्रण कक्ष
चोरी, हाणामारी, अपघात, हरवलेली व्यक्ती यांसाठी.
101 — अग्निशमन दल
आग, इमारत कोसळणे, बचाव कार्यासाठी.
108 — आपत्कालीन रुग्णवाहिका (महाराष्ट्र)
अपघात, हृदयविकार, गंभीर आजार — महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा.
102 — शासकीय रुग्णवाहिका (१०२) — राज्यभर
जुलै २०२६ पासून ही सेवा गर्भवती महिला व बाळांसोबत सर्व रुग्णांसाठी उपलब्ध केल्याची घोषणा झाली. गंभीर आणीबाणीत १०८ / ११२ वर कॉल करा.
103 — महिला हेल्पलाइन — पोलीस (मुंबई, ठाणे, नवी मुंबई)
या तीन पोलीस घटकांच्या क्षेत्रात संकटातील महिलांसाठी पोलीस मदत.
1091 — महिला हेल्पलाइन — पोलीस (मुंबई, ठाणे, नवी मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्र)
संकटात असलेल्या महिलांसाठी पोलीस मदत.
181 — १८१ — लाडकी बहीण योजना हेल्पलाइन
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी व तक्रारींसाठी (जानेवारी २०२६ पासून सुरू). संकटातील महिलांसाठी १०९१ / १०३ / ११२ वापरा.
1098 — चाइल्डलाइन
संकटातील, बेवारस किंवा शोषित मुलांसाठी २४ तास मदत.
1930 — सायबर गुन्हे हेल्पलाइन
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित कॉल करा; तक्रार cybercrime.gov.in वरही नोंदवता येते.
1033 — राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाइन
महामार्गावरील अपघात, बिघाड किंवा मदतीसाठी (NHAI).
139 — रेल्वे हेल्पलाइन
रेल्वे चौकशी, सुरक्षा व वैद्यकीय मदतीसाठी.
14416 — टेली-मानस (Tele-MANAS)
मानसिक तणाव, चिंता, नैराश्य यांसाठी मोफत समुपदेशन, २४ तास, अनेक भाषांत. पर्यायी क्रमांक: 1800-891-4416.
14567 — एल्डरलाइन — ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन
ज्येष्ठ नागरिकांसाठी माहिती, मार्गदर्शन व अत्याचाराच्या वेळी मदत.
1077 — जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष
पूर, भूस्खलन, चक्रीवादळ यांसारख्या आपत्तीत जिल्हाधिकारी कार्यालयाचा कक्ष.
1950 — मतदार हेल्पलाइन
मतदार यादीत नाव, मतदान केंद्र याबद्दल माहिती (निवडणूक आयोग).
1915 — राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन
फसवणूक, सदोष वस्तू/सेवा यांबाबत ग्राहक तक्रार व मार्गदर्शन (१७ भाषांत). पर्यायी क्रमांक: 1800-11-4000. ऑनलाइन तक्रार: consumerhelpline.gov.in.
15100 — मोफत कायदेशीर सहाय्य (NALSA)
गरजू व्यक्तींना मोफत कायदेशीर सल्ला व वकील मिळवण्यासाठी.